जन्मली ती निःस्वार्थी
ह्या पापमयी भूमीवरी
काय सांगू ह्या प्रीती विषयी
जोडे अर्थ माझ्या उभ्या आयुष्याला ती
परंतु, समजेना मजला
कसली ही प्रीती?
चिरडले तिला
नाकारले तिला
थुंकले तिच्यावरी
तरी सोडेना मजला
करे प्रीती मजवरी
समजेना मजला
कसली ही प्रीती?
फिरलो मी वन वन चहूकडे
पाहिले निरखून, शोधले सगळीकडे
नाही मिळाली प्रीती अशी
नाही भेटलं कोणीही मानवी
जो समजावेन मजला ह्या प्रीती विषयी
समजेना मजला
कसली ही प्रीती?
निजले मी परपुरुष्याच्या दारात
पाहिली वाट तिने सगळी रात्र
त्याच्याच दारात
झाली ती पाप मजसाठी
समजेना मजला
कसली ही प्रीती?
झाली ती निःशस्त्र
केले हरण तिचे वस्त्र
सोडली महिमा तिने
केले बलिदान अब्रू तिने
झाली ती शून्य
वाहिले तिने रक्त अमूल्य
समजेना मजला
कसली ही प्रीती?
अजूनही दिसती
सावली तिची
बघते ती वाट
पाऊल तिचे अजूनही
सोडेना माझी वाट
समजेना मजला
कसली ही प्रीती?
झाली प्रभात
अजूनही पडले मी
लोळत पापात
ठोकतो मनाचे दार ती
अजूनही त्या परपुरुष्याच्या दारात
समजेना मजला
आहो, कसली ही प्रीती?